Share with othersअंबाजोगाईत गुणवंतांचा सत्कार व करिअर विषयक मौलिक मार्गदर्शन अंबाजोगाई (प्रतिनिधी) : ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट प्रतिभा असते. ती वेळेवर ओळखून योग्य मार्गदर्शनाच्या आधाराने विकसित केली, तर तीच प्रतिभा विक्रमांचे शिखर गाठते,’ असे स्पष्ट, प्रभावी आणि प्रेरणादायी विचार सुप्रसिद्ध विधिज्ञ व अभ्यासू वक्ते ॲड. राहुल बनसोडे (नाशिक) यांनी व्यक्त केले. नालंदा फाऊंडेशन, बीड आणि आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित गुणवंत सत्कार व करिअर मार्गदर्शन सोहळ्यात ॲड. बनसोडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, ‘स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी…
Read Moreग्लोबल ईमी प्राइवेट लिमिटेड को “राष्ट्रीय दिव्य प्रतिभा सम्मान 2025” से नवाजा गया – बेस्ट एंटरप्रेन्योरशिप श्रेणी में सम्मान
Share with othersचिएंगकोंपांग, मणिपुर | जून 2025: मणिपुर स्थित अग्रणी वित्तीय सलाहकार कंपनी ग्लोबल ईमी प्राइवेट लिमिटेड को “राष्ट्रीय दिव्य प्रतिभा सम्मान 2025” से “बेस्ट एंटरप्रेन्योरशिप” श्रेणी में सम्मानित किया गया है। यह प्रतिष्ठित पुरस्कार ब्लू स्टार इवेंट्स द्वारा प्रदान किया गया। यह राष्ट्रीय स्तर का सम्मान संगठन के वित्तीय नियोजन, निवेश समाधान और समावेशी आर्थिक सशक्तिकरण के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान को रेखांकित करता है। यह सम्मान ग्लोबल ईमी की दूरदर्शी नेतृत्व शैली, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोण और उन्नत सेवाएं प्रदान करने की प्रतिबद्धता को मान्यता देता है। फ्यूचर फंड्स, सेविंग…
Read Moreमहात्मा गांधी जयंतीनिमित्त कचरा डेपो येथील महिलांना सुरक्षा साहित्य वाटप – मार्शल संघटित- असंघटित कामगार युनियन आणि नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. यांचा पुढाकार
Share with othersनाशिक, २ ऑक्टोबर २०२४ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने कचरा डेपो येथील महिलांना विशेष सन्मान देत त्यांचे श्रम आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी मार्शल संघटित- असंघटित कामगार युनियन व नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमात त्या महिलांना शारीरिक सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले जेणेकरून त्या त्यांच्या कामकाजामध्ये सुरक्षितपणे कार्य करू शकतील. कचरा डेपोमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या रोजच्या कष्टांमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य व सुरक्षेच्या समस्या येतात. यासाठी त्यांना योग्य सुरक्षा साहित्य देण्याचे उद्दिष्ट ठेऊन हा कार्यक्रम…
Read Moreनाशिक येथे तिसरे राज्यस्तरीय बौद्ध धर्म संमेलन संपन्न
Share with others“धम्मसंस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे डॉ. आंबेडकरांनी समाजावर अनंत उपकार केले” – मंगेश दहिवले नाशिक, २९ सप्टेंबर – भारतामध्ये बुद्ध शासन काळात बौद्ध धम्माची संस्कृती तब्बल बाराशे वर्ष टिकून राहिली, ज्यामध्ये मानवाच्या कल्याणाचा विचार केंद्रस्थानी होता. या धम्मसंस्कृतीमुळेच भारताचा जागतिक स्तरावर गौरव होत आहे. या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकांवर अनंत उपकार केले आहेत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धम्म अभ्यासक मंगेश दहिवले (नागपूर) यांनी केले. ते नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे धम्मकाया मिशन आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या बौद्ध धर्म संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या संमेलनाचा प्रारंभ…
Read More‘अंबाजोगाईतील संविधान भान आणि सामाजिक जाण’ उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद
Share with othersअंबाजोगाई (दि. १० सप्टें.) प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अंबाजोगाई येथील प्रा. सर नागेश जोंधळे यांच्या “आई” संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव “संविधानभान” उपक्रमाची ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणारी संस्था म्हणून ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सृजनशील कार्याच्या विविध क्षेत्रांतील उपक्रमांची नोंद घेतली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी आयोजित केलेल्या या उपक्रमात अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालय आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या परिसरात संविधानातील ३९५ कलमांचे शीर्षक असलेले ३९५ फलक प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी…
Read Moreभारतीय गिर्यारोहकांची ऐतिहासिक कामगिरी: 360 एक्सप्लोररच्या नेतृत्वात माउंट एलब्रूस शिखर सर
Share with othersनाशिक प्राईम न्यूज नेटवर्क (दि.१८ ऑगस्ट ): रशियातील युद्धजन्य परिस्थिती असतानाही, 360 एक्सप्लोरर ग्रुपच्या नेतृत्वाखालील भारतीय गिर्यारोहकांनी माउंट एलब्रूस शिखरावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या विविध व्यक्तींनी अनोख्या कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मोहिमेचे नेतृत्व करणारे आनंद बनसोडे हे माउंट एलब्रूस शिखर तीन वेळा सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन ठरले आहेत. यासोबतच 12 वर्षीय प्रीती सिंगने हे शिखर सर करून मध्यप्रदेशातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक म्हणून नाव कमावले आहे. उद्योजक विनोद विभूते यांनी डायबेटीस असूनही शिखरावर पोहोचत “डायबेटीस कॅन क्लाइम्ब माउंटन्स” हा संदेश दिला.…
Read Moreसंविधान जागरूकता आणि देशभक्तीचा संगम: ‘आई’ संस्थेचा स्वातंत्र्य दिन विशेष उपक्रम
Share with othersअंबाजोगाई (बीड) दि.१६ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अंबाजोगाई येथील प्रतिष्ठित शैक्षणिक आणि सेवाभावी संस्था ‘आई’ने ‘संविधान भान’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांची शिकवण तरुण पिढीमध्ये रुजवणे हा होता. कार्यक्रमाद्वारे संविधानाच्या मुलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करून सामाजिक जागरूकतेला बळकटी देण्यात आली. कृषी महाविद्यालय अंबाजोगाई आणि सिताफळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या ३९५ कलमांचे फलक हातात धरून एक मानवी साखळी तयार केली. ही साखळी भव्य वर्तुळाच्या स्वरूपात मांडून…
Read Moreनाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे काम बंद आंदोलन
Share with othersनाशिक (दि.०८ ऑगस्ट ) प्रतिनिधी : नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. (कचरा डेपो) कंपनीने ८ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनने कामगारांच्या समस्यांचा समावेश करून त्यांच्या निराकरणासाठी विनंती केली होती. तथापि, कंपनीच्या मालकांनी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून, कोणतीही सकारात्मक कृती केली नाही. या स्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, श्री. प्रशांत खरात यांच्या नेतृत्वात ८-८-२४ गुरूवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. युनियनने ठामपणे स्पष्ट केले आहे की, कामगारांच्या मागण्यांचे समाधान होईपर्यंत काम सुरू केले जाणार नाही. या आंदोलनाचे नेतृत्व…
Read Moreभारतीय हितरक्षक सभेकडून मानसिक आरोग्यावर शनिवारी (3 ऑगस्ट ) मोफत कार्यशाळा
Share with othersनाशिक : भारतीय हितरक्षक सभा, भारत या सामाजिक संघटनेमार्फत ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिलांचे मानसिक आरोग्य याविषयावर मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.३) दुपारी १२:३० ते ३ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.कार्यशाळा कविवर्य नारायण टिळक वाचनालय क्लासरूम, होलीक्रास चर्च, त्रंबकनाका सिग्नल जवळ, नाशिक येथे होणार असून ‘माझे मानसिक आरोग्य’ यावर मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील समुपदेशक तथा मानसिक आरोग्य प्रशिक्षक मुक्ता मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. १८ ते ३० वर्ष वयोगटातील फक्त ३० मुलींसाठी ही कार्यशाळा होणार असून त्यात मानसिक आरोग्य म्हणजे…
Read Moreशिक्षण सर्वांसाठी समृद्ध महाराष्ट्रासाठी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद
Share with othersनाशिक प्राईम न्यूज : राहुल बनसोडे (दि. २५ जुलै ): महाराष्ट्र शासनाने ८ जुलै रोजी राज्यातील मुलींसाठी पारित केलेल्या मोफत शिक्षण योजनेच्या अनुषंगाने आज, २५ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ६०००० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. या संवादात अनेक विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता आल्याने हा संवाद सुसंवाद ठरला. संवाद कार्यक्रमात काय म्हणाले चंद्रकांत पाटील? राज्यातील मुलींना शिक्षण मिळावे, त्यांची शिक्षणात पीछेहाट होऊ नये म्हणून १००% शिक्षण शुल्क माफ करणारी योजना ८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाकडून…
Read More